Last Updated (Friday, 04 November 2011 06:07)
धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्थेने ऑनलाईन प्रसिध्दी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
धुरी एक्रसप्रेस चे संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी यांना महाराष्ट्र लोककलावंत
प्रतिष्ठाने यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार 2011 सन्मानपूर्वक प्रदान
करताना शिवसेना उपनेते, माजी आमदार अनंत तरे, जेष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर
ठाणावाला , साहित्यिका नम्रता भट आाणि कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष मधुसूदन सुगदरे
आदी दिसत आहेत.
ठाणे - धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्थेने ऑरनेट टॅक्नॉलॉजीस कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ‘चाणक्य धुरी’ संगणकप्रणाली उपलब्ध केली आहे. ही संगणक प्रणाली आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुक-2012साठी उपयुक्त आहे. या संगणक प्रणालीचा शुभारंभ नुकताच ठाणे शहरातील सर्वपक्षीय शहर अध्यक्षांच्या हस्ते झाला. यापुढील एक भाग म्हणून धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्थेने ‘निवडणुक वोटींग स्लीप एसएमएसद्वारे मोबाईलवर’ या संकल्पनेचा शुभारंभ सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2011 रोजी धुरी एक्सप्रेस कार्यालयात ठाणे शहर सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱयांच्या हस्ते केला.या संगणक प्रणालीमुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत निवडणुक लढविणे उमेदवाराला सोपे जाणार असून त्याचा नक्कीच फायदा सर्वपक्षीय उमेदवारांना होईलच तर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी मतदाराचे नाव, प्रभागक्रमांक, अनुक्रमांक, लिंग,मतदार, केंद्र, खोली क्र. या विषयीची माहिती एसएमएस निवडणुक स्लिपव्दारे पुरविण्यात येईल. असे स्पष्ट मत सर्व महिला पदाधिकाऱयांनी व्यक्त केले.शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक अनिता बिर्जे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस अॅड. माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा ज्योती ठाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा वनिताताई राजेंद्र गोतपागर, मनसेच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा अनुया मिसाळ, धुरी एक्सप्रेसच्या संचालिका प्रगती संतोष धुरी, जयश्री विकास मिराशी,ऑरनेट टॅक्नॉलॉजीस प्रा.लि च्या संचालिका कुमुद भोजने यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी धुरी एक्सप्रेसचे संचालक संतोष धुरी, विकास मिराशी हे सुध्दा उपस्थित होते.‘चाणक्य धुरी’ या संकल्पनेमुळे महाप]िलका निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांला निश्चितच फायदा होईल.पालिका निवडणुकीत मतदारची माहिती गोळा करताना उमेदवारांची तारांबळ उडते. परिणामी ‘चाणक्य धुरी’ या संगणकप्रणाली मुळे निवडणुक जिंकण्याचे काम सोपे झाले असल्याचे मत शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक अनिता बिर्जे यांनी व्यक्त केले. चाणक्य धुरी या तंत्रज्ञानामुळे उमेदवारांना मतदारांसाठी वेळ देता येणे शक्य होणार आहे. निवडणुकीत मतदार केव्हा मतदान करतात यांची निश्चित माहिती या संगणकप्रणाली उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणामुळे महिलांना पालिका निवडणुकीत एक चांगली संधी मिळली असल्याचे त्यांनी सांगितले.‘चाणक्य धुरी’ या आधुनिक तंत्रज्ञानामुळे निवडणुक जिंकता येणे आता सोपे जाईल. तसेच राज्य शासनाने महिलांना जाहिर केलेल्या 50 टक्के आरक्षणाचे गणित कागदावरच न राहता त्यांचा महिला उमेदवार कोणत्या पध्दतीने फायदा घेऊ शकतील, याचे गणित ‘चाणक्य धुरी’ या संगणक प्रणाली करणार असल्याची म]िहती भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस अॅड. माधवी नाईक यांनी सांगितले. धुरी एक्सप्रेसने ‘ऑरनेट’ टेक्नॉलॉजीसच्या सहाय्याने उपलब्ध केलेले ‘चाणक्य धुरी’ संगणकप्रणालीमुळे सर्वपक्षीय म]िहला उमेदवारांना फायदा होईल असे त्या शेवटी म्हणाल्या.धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्था आणि ऑरनेट टॅक्नॉलॉजीस प्रा.लि च्या मार्फत ‘चाणक्य धुरी’ हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. ‘चाणक्य धुरी’ ही एक चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेमुळे आगामी महाप]िलका निवडणुकीत महिला उमेदवारांना निवडणुक जिंकता येणे शक्य होणार असल्याचे ठाम मत मनसे महिला ठाणे शहर अध्यक्ष अनुया मिसाळ यांनी व्यक्त केले. धुरी एक्सप्रेसची एसएमएस ही एक चांगली संकल्पना आहे, या संकल्पनेमुळे आम्हांला अर्ध्या तासातच बातमी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने महिलांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केल्यामुळे नक्कीच महिला उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या संधीचे सोने आता ‘चाणक्य धुरी’ संकल्पनेमुळे सत्यात उतरविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ‘चाणक्य धुरी’ या संकल्पनेमुळे उमेदवारांचा वेळ वाचणार आहे. तसेच कमी वेळात उमेदवाराला मतदारांपर्यत पोहचवता येणार असल्याचे त्यांनी साग़ितले. आगामी महापालिका निवडणुकीच्या स्पर्धाचे महिलांचे महत्त्व पुन्हा ‘धुरी एक्सप्रेस’मुळे आधोरेखित झाले आहे. ‘घंटों का काम मिनिटोमें’ असे बोलून या प्रणालीचे कौतुक केले.संपर्क-9224524892,8108669000
Last Updated (Monday, 17 October 2011 15:08)
धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्थेच्या सेवा न्यूज, फोटोग्राफी,व्हिडीओ शूटिंग, न्यूज पेपर आणि टिव्ही जाहिरात बल्क एसएमएस, व्हाईस एसएमएस बल्क ई-मेल, ई-बुक, वेब डिझायनिंग, क्रिन प्रोजेक्टर, न्युज फॅक्स,प्रमो धुरी एक्सप्रेस साप्ताहिक, निवडणुक जिंकण्यासाठी सर्व काही ‘चाणक्य धुरी’ Mob.-9224524892, 8108669000,25301947
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
Add : TMC School 12/3, Tebhi Naka, Thane (w)

निवडणुक जिंकण्यासाठी सर्व काही ’चाणक्य धुरी“ या संगणक प्रणालीचे उद्घाटन भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर चाणक्यच्या भूमिकेत ठाण्याचे सिने नाट्यकलाकार मयुरेश कोटकर धुरी एक्सप्रेसचे संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी याप्रसंगी ते उपस्थित होते. Last Updated (Saturday, 08 October 2011 10:37)
ठाणे - ‘राजकीय क्षेत्र’ आजच्या पिढीचे अत्यंत लक्षवेधी क्षेत्र आहे. क्षेत्र कुठलेही असले तरी आजच्या धावत्या व स्पर्धात्मक जगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर ’व्यवस्थापन“ हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. राजकीय कारकीर्द सुरु करुन टिकवून ठेवणे व उत्तरोत्तर प्रगती करणे ही एक तारेवरील कसरत आहे. सत्तास्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हांला राजकीय विश्लेषन अत्याधुनिक तंत्रज्ञान व सखोल व्यस्थापनाची गरज असते. राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी व निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱया गोष्टींचा विचार करुन ‘चाणक्य धुरी’ इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टम ही संगणक प्रणाली ऑरनेट टेक्नॉलॉजीस प्रा.लि. आणि धुरी एक्सप्रेसने तयार केली असून त्याचे नामकरण ‘चाणक्य धुरी’ असे केले आहे.या संगणक प्रणालीचे उद्घाटन ठाणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शहर अध्यक्षांच्या हस्ते धुरी एक्सप्रेस कार्यालयात आयोजन केले होते. त्यावेळी शिवसेना शहरप्रमुख रमेश वैती, काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, मनसेचे ठाणेशहर प्रमुख हरी माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर कार्याध्यक्ष मिलिंद पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते एमपीपीसी सेक्रेटरी मनोज शिंदे, ऑरनेट टेक्नॉलॉजीस प्रा.लि.चे संचालक राम भोजने, चाणक्यच्या भूमिकेत ठाण्याचे सिने नाट्यकलाकार मयुरेश कोटकर धुरी एक्सप्रेसचे संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी यांच्या उपस्थितीत ’चाणक्य धुरी“ या संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी ई-मेल आणि एसएमएस ही आजच्या काळातील संवादाची महत्त्वाची साधने असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान थ्रीजी, फोर जीच्या दिशेने जग वेगाने झेपावते आहे. त्यामुळे चाणक्य धुरी या आधुनिक प्रणालीचे तंत्रज्ञान अवलंबणे ही काळाची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले. संगणकाच्या माध्यमातून उमेदवाराला त्यांच्या प्रभागातील मतदारांची सर्व प्रकारची वर्गवारी, खात्रीची मते, कार्यकर्त्यांची कामे, मतदानाची टक्केवारी, आदींची स्वतंत्रपणे वर्गवारी करता येते. तसेच पैसा व कार्यकर्त्यांच्या श्रमाची बचत होईल. ही निती स्वीकारणे अगदीच कमी खर्चाचे आहे. वार्ड ऐवजी प्रभाग पध्दती झाल्यामुळे मोठ्या मतदारसंघात मतदार व कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे कठीण जाणार आहे. परंतु चाणक्य धुरी या संगणक प्रणालीमुळे उमेदवारांना निवडून येण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. उमेदवारांच्या संपूर्ण गरजा त्यांच्या अडचणी चाणक्य धुरी इलेक्शन मॅनेजमेंट नितीप्रमाणे उमेदवारांनी अवलंब केला त्यांचा विजय सुकर होईल, अशी माहिती धुरी एक्सप्रेसचे विकास मिराशी आणि ऑरनेट टेक्नॉलाजीस प्रा. लि.चे राम भोजने यांनी दिली.नियमित बदल व नाविन्यपूर्ण कल्पना हे चाणक्य धुरीचे खास आकर्षण ठरले आहे. या ही वेळी एक नविन संकल्पना चाणक्य धुरी या प्रणालीच्या माध्यमातून आपणासमोर मांडण्यात आली आहे. या सिस्टीममुळे उमेदवारांना मतदारांचे वर्गीकरण, तसेच जात व प्रांत, आडनाव, गठ्ठा मतदार, सोसायटी व चाळी, वय, दुबार मतदार, वर्गीकरणानुसार रचना करण्यात आली आहे. तसेच व्हॉईस एसएमएस,टेक्स एसएमएस पाठविण्याची सोय आहे. राजकीय नियोजन कार्यक्रम, कार्यकर्ते नियोजन, निवडणूक खर्च इत्यादी माहिती आहे. अत्याधुनिक सर्वे साहित्यामध्ये प्रभागाच्या सर्वेसाठी आधुनिक यंत्राचा वापर व कॉम्प्युटरची अपडेटिंगची सोय आहे. ई वोटर स्लिप पुर्ण कुंटुंबाची वोटर स्लिप एसएमएसद्वारे एकाच मोबाईलवर मिळेल यादीमध्ये माहिती भरण्यासाठी पत्ता, मोबाईल नं., शिफ्टेड, मृत, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका मागील मतदानाचे निकाल आदी माहिती आहे. मतदानाच्या दिवशी पूर्ण 9 तासांचे नियोजन आलेले व न आलेले मतदार व कार्यकर्त्यांचे नियोजन, काही सेंकदात थेट मतदार व कार्यकर्त्यांशी संपर्क साधता येणार असून त्यामुळे चाणक्य धुरीचा संगणक प्रणालीचा वापर करणाऱया उमेदवारांचा विजय मार्ग सोपा होईल व कार्यकर्त्यांचे शारीरिक श्रम कमी होतील. इच्छुकांसाठी फ्री डेमो रोज धुरी एक्सप्रेसच्या कार्यालयात सकाळी 11.00 ते सायं.8.00 या वेळेत नियोजन केले आहे. अधिक माहितीसाठी 9224524892, 8108669000, 25301947 संकेतस्थळ :www.dhuriexpress.com साधावा.कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवी सहित्यिक संपादक शब्दब्रम्ह संदीप मोडक यांनी केले. कार्यक्रमास दत्तात्रय घरत, विकास काळे, आबाजी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘‘ई-मेल आणि एसएमएस ही आजच्या काळातील संवादाची महत्त्वाची साधने आहेत. तंत्रज्ञान थ्रीजी, फोर जीच्या दिशेने वेगाने झेपावते आहे. अशा काळात तंत्रज्ञानाचे हे चक्र का उलटे फिरवीत आहात?’’-आदित्य ठाकरे ब्लक एसएमएसवर बंदीचा फेरविचार कपिल सिब्बल यांचे आदित्य ठाकरे यांना आश्वासन नवी दिल्ली, दि. 30 (विशेष प्रतिनिधी) - दिवसाला शंभरपेक्षा जास्त एसएमएस करण्यास दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने घातलेल्या सरसकट बंदीचा सरकार फेरविचार करेल आणि एसएमएसची संख्या वाढविण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आज दिले. एकगठ्ठा एसएमएसवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय ‘ट्राय’ने घेतला आहे. हा निर्णय व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा युवा सेनेने दिला होता. यासंदर्भात युवा सेनेची भूमिका मांडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेतली. सरकारने ‘ट्राय’च्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. ‘अनावश्यक एसएमएसमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो यात शंकाच नाही, पण त्यावर उपाय योजताना व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे भान सरकारने ठेवायला हवे,’ अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. अनेक स्वयंसेवी संस्थांना आपल्या कामासाठी अनेकदा शंभरपेक्षा अधिक एसएमसएस करावे लागतात,’ असेही आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणले. सिब्बल यांनी आदित्य ठाकरे यांची भूमिका लक्षपूर्वक ऐकून घेतली. या संपूर्ण प्रश्नात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन सिब्बल यांनी दिले. तुमच्या माध्यमातून युवकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करू. ट्रायचे अध्यक्ष मायदेशी परतल्यानंतर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या शिष्टमंडळात िर्ंिशवसेना विभागप्रमुख ऍड. अनिल परब, युवा सेनेचे ऍड. राहुल नार्वेकर, पूर्वेश सरनाईक यांचा समावेश होता. आदित्य तो हिरो है आदित्य ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुषमा स्वराज यांनीही आस्थेने
त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.‘युवा सेनेची मागणी सरकारपुढे योग्य पद्धतीने मांडू,’ असे आश्वासन स्वराज यांनी त्यांना दिले. आदित्य यांच्यासोबत एकत्रित फोटो काढल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ‘‘आदित्य तो हीरो है, युवकांसाठी ते खूप चांगले काम करीत आहेत,’’ अशी शाबासकीही दिली. -
|