प्रसार माध्यमातिल प्रसिद्धिसाठी आमच्याशी संपर्क साधा | बातम्या | लेख | विडियो शूटिंग | जाहिराती | एसएम्एस मार्केटिंग | ईमेल मार्केटिंग | प्रेस कॉन्फरन्स | स्क्रीन प्रोजेक्टर | टीवी लाइव टेलेकास्ट | भाषा परिवर्तन (Translation) | ==>> संतोष धुरी ९२२४ ५२४८ ९२ | एम् विकास ==>>९३२३ ८२६३ ४७ - टीमसी शाळ| , नगर वाचन मंदिराजवळ, तेम्भी नाका, ठाणे (प) ईमेल - dhuriexpress@gmail.com

Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies
Photo Gallary
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
  • भारिप बहुजन महासंघ
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
  • भारिप बहुजन महासंघाच्यावतीने...
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.मोर्चाला संबोधताना भारिप युवा नेते विजय घाटे आदि दिसत आहेत.
  • sunil-khambe-b-day
    कर्मवीर सुनिल खांबे यांना वाढदिवसानिमित्त धुरी एवसप्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देताना संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी .
  • ProNarayan_Deshmukh
    पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य शहापूर आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 40 शाळांमध्ये मोफत वहया वाटप केले.
  • tmc
    ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींतर्गत घोडबंदर रोडवरील विजयनगरी कॉम्प्लेक्स समोर बांधलेले 14 व्यावसायिक गाळे जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. उपायुक्त बी.जी.पवार, परिमंडळ 3 चे उपआयुक्त हरिश्चंद्र मोरे, सहायक आयुक्त घनश्याम थोरात, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.
Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies

लालबागच्या राजाची प्रतीक्षा एसी !

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणावर नवस फेडण्यासाठी गणेशोत्सवात दररोज किमान एक लाख भाविक राजाच्या दरबारात हजेरी लावतात. नवसाची रांग दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदा प्रथमच साठ हजार स्क्वेअर फुटांचा संपूर्ण एसी मंडप नवसाच्या भाविकांसाठी तयार केला आहे. राजाचा नवस फेडण्यासाठी सोळा ते अठरा तास रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांसाठी यंदा प्रथमच एसीमध्ये बसण्याचीही सुविधा मिळणार आहे. त्याशिवाय मंडपात अठ्ठावीस पक्की शौचालय व स्वच्छतागृहांची सोय होणार आहे. लालबागच्या राजाच्या आगमनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे. गणेशोत्सव काळात दररोज १० लाखांहून अधिक भाविक राजाचे मुखदर्शन घेतात. नवस फेडण्यासाठी दररोज किमान एक लाख भक्त रांगेत उभे असतात. गेल्या वषीर् गणेशोत्सवात सव्वा कोटी गणेशभक्तांनी राजाच्या दरबारी हजेरी लावली होती. दिवसेंदिवस वाढणारी गदीर् लक्षात घेऊन दरवषीर् भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा प्रयत्न आहे.
 

मुंबईकरांना सणासुदीला मुबलक पाणी !

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व जलाशय तुडुंब भरल्याने शहर व उपनगरांमध्ये सुरू असलेली पाणीकपात रद्द व्हावी, अशी जोरदार मागणी होत असताना ही पाणीकपात सप्टेंबरपुरती, म्हणजे सणासुदींपुरती रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी महापालिका प्रशासनाने केली. पालिकेच्या या घोषणेने शिवसेनेला धक्का बसला आहे. मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याची शिवसेना-भाजप युतीची आधीपासूनची मागणी होती. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या विषयावर प्रशासनाची बैठकही घेण्यात आली. तेव्हा पाणीकपात रद्द करण्यास नकार देत प्रशासाने ती सुरूच ठेवणे कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले होते. युतीनेही त्यास सहमतीही दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी दुपारी पाणीकपातीसंदर्भात पत्रकार परिषद बोलावली तेव्हाच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपात रद्द न झाल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला. थोड्याच वेळात आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी पत्रकार परिषदेत सप्टेंबरपुरती पाणीकपात रद्द होत असल्याचे जाहीर केले. सिंह यांची पत्रकार परिषद आणि तुमचा निर्णय हे परस्परास पूरक आहे का, असे विचारले असता, 'आम्ही प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला आहे', असे उत्तर त्यांनी दिले.
 

आला शाळेच्या मुलींचा गोविंदा !

सहा थरांची देणार सलामी !

दहीहंडी हा खरा बालगोपाळांचा उत्सव. पण, हल्ली या उत्सवात बालगोपाळ दिसतात ते थेट आठव्या किंवा नवव्या थरावर... यंदा खऱ्या अर्थाने बालगोपाळांचे गोविंदा पथक मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसेल. वडाळ्यातील श्ाी गणेश प्राथमिक शाळेने गोविंदा पथक तयार केले आहे. विशेष म्हणजे हा केवळ मुलींचा गोविंदा आहे...असे पथक तयार करणारी ही मुंबईतील पहिलीच शाळा आहे! मुलीच्या बरोबरीने मुलींमध्येही खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही दोन वर्षापूवीर् पहिल्यांदा दहीहंडीचा आधार घेतला. फिटनेसचे महत्त्व यातून आम्ही विद्यार्थ्यांना पटवून दिले. शिवाय लहान वयातच टीम वर्कचे धडे देण्यासाठीही याचा प्रचंड उपयोग झाला. शाळेत शिकणारी बहुतांश विद्याथीर् हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे सर्वप्रथम पालकांना विश्वासात घेऊन त्यानंतरच मुलींचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती शाळेचे ट्रस्टी आणि या पथकाचे प्रशिक्षक मनोहर सालावकर यांनी 'मटा'ला सांगितले. दहीहंडीच्या तयारीतूनच शाळेने कबड्डीसह विविध खेळात मुलींचे चांगले संघ तयार केल्याचेही सालावकर म्हणाले.
 

खेळाडूंसाठी खूषखबर !

कॉलेज व शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा प्रकारांची चुणूक दाखविण्याची संधी युवक सेवा संचलनालयद्वारे विविध स्पर्धा घेतल्या जातात. या स्पधेर्त सहभागी होणाऱ्या नवी मुंबईतील विविध शाळांना गेली अनेक वषेर् या स्पर्धा नवी मुंबईत तालुका स्तरावर खेळून मगच ठाण्याला जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी जावे लागत असे. परंतु, नवी मुंबई पालिकेच्या क्रीडा विभागाने घेतलेल्या पुढाकाराने गेल्या वषीर्पासून या स्पर्धांचे जिल्हास्तरीय आयोजन नवी मुंबईतच होऊ लागले आहे. पालिकेने गेल्या वषीर्पासून जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत येणाऱ्या या स्पर्धा नवी मुंबई क्षेत्रात घेण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर या परिसराला क्रीडा क्षेत्रात जिल्हास्तरीय दर्जा प्राप्त करून घेता येईल, असा जीआर सरकारने २००३ साली काढला. त्यानुसार गेल्या वषीर्पासून ज्या स्पर्धांना तालुका स्तराच्या दर्जावर मानले जात असे त्या स्पर्धांना जिल्हास्तरीय दर्जा मिळाला
 

गणपतीबाप्पा चालले अमेरिका !

Godसरकारनेही दिली विसर्जनाची परवानगी

आगमनाने वातावरण मंगलमय करणारा आणि विसर्जनाने मनाला रुखरुख लावणारा श्रीगणेशाचा उत्सव यंदा महाराष्ट्राची सीमा ओलांडत थेट अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पोहोचणार आहे. ढोेलताशांचा कडकडाट, मोदकाचा घमघमाट आणि गुलालाच्या उधळणीने वातावरण भारून टाकणारा हा उत्सव अमेरिकेतील गणेश भक्तांना याची देही याची डोळा अनुभवता यावा यासाठी प्रथमच श्रीगणेश चतुथीर् ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवस बाप्पांचा मुक्काम अमेरिकेत असणार आहे. कामानिमित्त अनेक भारतीय कॅलिफोनिर्यामधील सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये स्थायिक झाले असून गेली ३० वषेर् ही मंडळी एकत्रित येऊन श्रीगणेशाची पूजा करतात. येथील फ्रेमोंट परिसरात गणेशाचे कायमस्वरुपी मंदिर असावे यासाठी इथल्या गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली असून यंदा ही मंडळी या मंदिरात दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. अमेरिकन सरकारकडून गणेशविसर्जनाची परवानगी देखील या मंडळींनी मिळवली आहे.

 

रिक्षाचालकांचा ६ ऑक्टोबरला राज्यव्यापी संप !

रिक्षावाल्यांना या पुढे मारहाण झाली तर 'जशास तसे उत्तर' देण्याचा इशारा रिक्षावाल्यांचे नेते शरद राव यांनी दिला आहे. रिक्षावाल्यांना मारहाण करून सर्वसामान्यांचे महागाईवरचे लक्ष उडवायचे आणि त्यासाठी राज्य सरकार राज ठाकरे व 'स्वाभिमान'चा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी आझाद मैदानात धरणे धरले होते. यामध्ये डॉ. बाबा आढाव, शरद राव, तंबी कुरीयन आदी सहभागी झाले होते. पत्रकार परिषदेत शरद राव म्हणाले, रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ६ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पुकारण्यात येईल. यामध्ये पंधरा लाख रिक्षा चालक सहभागी होतील.
 

नोकरदारांना होणार 'प्रत्यक्ष' लाभ !

सर्वसामान्य करदाते तसेच उद्योगजगतावरील टॅक्सचे ओझे कमी करून टॅक्सची व्याप्ती वाढवण्याचे ऐतिहासिक पाऊल गुरुवारी केंद सरकारने उचलले. ब्रिटिशकालीन इन्कम टॅक्सला 'डायरेक्ट टॅक्स कोड'चा पर्याय उभा करीत नोकरदार व उद्योजकांनाही दिलासा देण्याची किमया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत साधण्यात आली. यानुसार नोकरदारांचे २ लाखांपर्यंतचे, तर वरिष्ठ नागरिकांचे अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आहे. कॉपोर्रेट टॅक्सवर यापुढे कोणताही सरचार्ज किंवा सेस लागणार नाही. एप्रिल २०११पासून ही टॅक्सप्रणाली लागू होईल.
 

१०० टक्के महिलाराज

महिलांचं राज्य काय असतं याचा खऱ्या अर्थाने अनुभव घ्यायचा असेल तर बीडच्या वडवणी तालुक्यातील डुकरे गावाला भेट दिलीच पाहिजे. गेली १५ वर्षे या गावात सरपंचासह ग्रामपंचायतीचे संपूर्ण पॅनेलच महिलांचे आहे. त्यासाठी डुकरे गावच्या महिलांना कुठल्या आरक्षणाची गरज नाही. गावाचा खरा विकास करायचा असेल तर 'महिलाराज'शिवाय तरणोपाय नाही, असे वाटल्याने गावातील बाप्यांनी जाणूनबुजूनच महिलांच्या हातात सत्ता दिली आहे. गावच्या राजकारणात केवळ सवर्णच नव्हे तर मुस्लिम, मांग, चर्मकार, वंजारी अशा सर्वच समाजातील महिलांचा समावेश आहे हे विशेष! अशा या डुकरे गावातून बिनविरोध निवडून येत १५ वषेर् सरपंचपद भूषविलेल्या गयाबाई उर्फ जिजी आव्हाड सध्या बीड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती आहेत. मांग समाजात जन्मलेल्या, कधीकाळी याच गावात शेणी काढणे, दोरखंड वळणे आदी वेठबिगारीची कामे करणाऱ्या व शाळेचे तोंडही न पाहिलेल्या गयाबाईंना सरपंच करायचे गावाने एकमताने ठरवले.
 

फेरीवाल्यांचे अतिक्रमण !

कळंबोली शहरातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर व पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. याचा त्रास नागरिक व विशेषत: वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढत आहे. फेरीवाले, टपरीवाले यांनी कळंबोलीत सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. मोटारसायकली व चारचाकी वाहनेही रस्त्यावरच उभी केली जातात. सायंकाळी वाहतूककोंडी होते.
 

Join Best Friends Network

Nice Social Bookmark
Facebook MySpace Twitter Digg Delicious Stumbleupon Google Bookmarks RSS Feed 
ताज्या बातम्या
Live Money Machine