शाळेतच मिळणार दाखले; पालकांची थांबणार वणवण !
दाखल्यांसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज करावा.या दाखल्यांसाठी शाळा किंवा महाविद्यालयात देण्यात आलेले अर्ज भरून तेथेच द्यायचे. त्यासाठी लागणारे शुल्कही शाळेतच भरायचे. अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही शाळेत मिळणार.
ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा !माहिती व तंत्रज्ञानाच्या (आयटी) युगात संगणकाचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला असून, सायबर क्राईममध्येसुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. त्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट हाताळताना आपली माहिती गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जागरूकता आणि थोडी काळजी घेतल्यास "सायबर क्राईम'वर प्रतिबंध घातला जाऊ शकतो, असा सल्ला जगप्रसिद्ध "सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट' अंकित फादिया यांनी आज येथे दिला. मौदा येथील महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रासाठी नागपुरात आलेले फादिया "सकाळ'शी बोलताना म्हणाले, "आज घराघरांत मोबाईल व इंटरनेट पोचले. इंटरनेट हाताळल्याशिवाय मुलांचा एकही दिवस जात नाही. व्यस्ततेमुळे पालक याकडे लक्ष देत नाहीत. त्या परिस्थितीत मुलगा चुकीच्या मार्गाने जाऊन गुन्हेगारीत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांनी यासंदर्भात अधिक जागरूक राहण्याची शक्यता आहे. मुलांनीही इंटरनेटप्रेम एका मर्यादेत ठेवले पाहिजे.'
वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांचे आदिवासी परिसरात मोफत वह्य़ा वाटप
कळव्यातील इमारत कोसळून दहा ठार !कळव्यातील सोनीबाई भुवन या तीन मजली इमारतीची एक विंग मंगळवारी दुपारी कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. कळव्याच्या गावदेवी परिसरातली ही इमारती १९८० साली उभारण्यात आली होती. त्यावेळी कळव्यात ग्रामपंचायतीची हद्द असल्याने बेकायदा इमारतींचा सुळसुळाट झाला होता. ही इमारतदेखिल अनधिकृतच होती. धोकादायक अवस्थेत ही इमारत उभी असली तरी काही तांत्रिक बाबींमुळे पालिकेने या इमारतीला धोकादायक घोषित केले नव्हते. सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याची नोटीसही रहिवाशांना बजावण्यात आली नव्हती. २० कुटुंब जीव मुठीत धरून या इमारतीतच रहात होती.
संतुलित ग्राम योजना प्रभावी राबवणार !तामपानवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात घोषित केलेेली पर्यावरण संतुलित ग्राम योजना सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या लोकसंख्येइतकी झाडे लावून त्या तुलनेत किमान चार लाख तर कमाल १२ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांनी हा निधी मिळवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. तापमानवाढीसाठी जिल्ह्यात यंदा २८ लाख झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला. 'एक व्यक्ती, एक झाड' या उपक्रमातून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केले.
संतुलित ग्राम योजना प्रभावी राबवणार !तामपानवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात घोषित केलेेली पर्यावरण संतुलित ग्राम योजना सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या लोकसंख्येइतकी झाडे लावून त्या तुलनेत किमान चार लाख तर कमाल १२ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांनी हा निधी मिळवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. तापमानवाढीसाठी जिल्ह्यात यंदा २८ लाख झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला. 'एक व्यक्ती, एक झाड' या उपक्रमातून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केले.
इअरफोन घेतोय प्रवाशांचे बळी !कानात इअरफोन घालून मोबाइलवर गाणी ऐकत प्रवास करण्याची तरुणांची सवय अतिशय घातक सिद्घ होत आहे. दिवा ते डोंबिवली दरम्यान लोकलची धडक बसून ठार होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूमागे अनेकांची ही सवय कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कोपरसह दिवा व डोंबिवली या ३ रेल्वे स्टेशनांदरम्यान ८ महिन्यातच १०० जणांचे बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. फूट ओव्हर ब्रीजचा अभाव, लोकलच्या वेगाचा अंदाज न आल्याने बसलेली धडक, लोकलमध्ये लटकताना बाहेर पडून अपघाती मृत्यू अशा प्रमुख कारणांमुळे हे बळी गेले आहेत. मात्र या कारणांसह आणखी एक धक्कादायक कारण अपघातांमागे उघड झाले. तरुण मुलांना मोबाइलवर गाणी ऐकत रेल्वेरुळ ओलांडण्याची सवय असते. मात्र त्यामुळे वेगाने आपल्या दिशेने येणाऱ्या लोकलचा धडधडाटच त्यांना ऐकू येत नाही व त्यांचा हकनाक बळी जात असल्याचे निरीक्षण एका स्टेशन मॅनेजरने नोंदवले.
बिर्ल्ण्सनी मुंबई बिघडवली !नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिीनियरिंग रिसर्च इन्स्टीट्यूट आणि केंदीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने मुंबईतल्या प्रदूषणाला कोणते घटक कारणीभूत आहेत याची पाहणी केली.
यामध्ये, मुबईत सध्या ज्या वेगाने तुफान बांधकामे सुरू आहेत त्यामुळे हवेत सतत धुळ उडते आणि बांधकामासाठी वापरलेल्या वस्तूंचे सुक्ष्म कणही हवेत तरंगत असतात. यामुळे श्वासोश्वासाला त्रास होतो. श्वास घेण्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. फुफ्फुसांवर याचा परिणाम होतो अशा अनेक बाबी संबंधित डॉक्टरांनी मुंबईकरांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. या खेरीज रस्त्यांची सतत कामे सुरू असतात त्याचाही परिणाम मुंबईकरांच्रा आरोग्यावर होतो असे या अहवालात म्हटले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भूकंप !आज (मंगळवार) पहाटे एक वाजून सात मिनिटांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला २.६ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू ठाण्यामध्ये होता. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
|




शहापूर- पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण आप्पा देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहापूर तालुक्याच्या किन्हवली या आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमध्ये मोफत वह्य़ा वाटप केले.वाचकोले, शिवाजीनगर, चेरवली, कानवे, फोफोडी, खरीड, आपटे, चरीव, मानेखिंड,बर्डेपाडा, चिखलगांव, वेहलोली, खरिवली, लहूवाडी, डोंगरीवाडी, नांदगांव, शेलवली,सावरोली, नामपाडा,कानडी, झापवाडी, धोंडाळपाडा, नडगांव, निपूर्तेपाडा,ढाढरे, बेलवली,हुंबाचा पाडा, भिंगुर्ले, साखरपाडा, डोंगरवाडी, उंबरवाडी, दहिवली, गांडूळवाडी, वाशाळ,कोठारे, चांग्याचा पाडा, परळी ,बेडीसगाव, फर्डेपाडा, रिकामवाडी आदी गावातील शाळांचा समावेश होता. या उपक्रमामध्ये देशमुख यांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला यामध्ये त्यांची मुलगी संध्या देशमुख, मुलगा अ़मृत देशमुख, सून परीनीता देशमुख, शुभंकर व गंधार विरगी, सुयोग व वनिता लोंढे, राज व ऋतू लोकरे,माया माने आदि उपस्थित होते.व याच बरोबर पर्यावरण संतुलनासाठी किन्हवली येथे देशमुखांच्या पुढाकाराने 45 हजार झाडे लावण्यात आली यामध्ये काजू, आंबा, आवळा, चिकूसह अनेक झाडांचा समावेश आहे.