प्रसार माध्यमातिल प्रसिद्धिसाठी आमच्याशी संपर्क साधा | बातम्या | लेख | विडियो शूटिंग | जाहिराती | एसएम्एस मार्केटिंग | ईमेल मार्केटिंग | प्रेस कॉन्फरन्स | स्क्रीन प्रोजेक्टर | टीवी लाइव टेलेकास्ट | भाषा परिवर्तन (Translation) | ==>> संतोष धुरी ९२२४ ५२४८ ९२ | एम् विकास ==>>९३२३ ८२६३ ४७ - टीमसी शाळ| , नगर वाचन मंदिराजवळ, तेम्भी नाका, ठाणे (प) ईमेल - dhuriexpress@gmail.com

Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies
Photo Gallary
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
  • भारिप बहुजन महासंघ
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
  • भारिप बहुजन महासंघाच्यावतीने...
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.मोर्चाला संबोधताना भारिप युवा नेते विजय घाटे आदि दिसत आहेत.
  • sunil-khambe-b-day
    कर्मवीर सुनिल खांबे यांना वाढदिवसानिमित्त धुरी एवसप्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देताना संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी .
  • ProNarayan_Deshmukh
    पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य शहापूर आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 40 शाळांमध्ये मोफत वहया वाटप केले.
  • tmc
    ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींतर्गत घोडबंदर रोडवरील विजयनगरी कॉम्प्लेक्स समोर बांधलेले 14 व्यावसायिक गाळे जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. उपायुक्त बी.जी.पवार, परिमंडळ 3 चे उपआयुक्त हरिश्चंद्र मोरे, सहायक आयुक्त घनश्याम थोरात, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.
Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies

उ.महाराष्ट्र Uttar Maharashtra Marathi News Batmya Website उ.महाराष्ट्र

कम्प्युटर सायन्सचा निक्काल?

धुळे जिल्ह्यातील डिप्लोमा कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स डिप्लोमा अभ्यासक्रमाचा अडव्हान्स जावा आणि एम्बेडेड सिस्टिम या विषयांचा धक्कादायक निकाल लागल्याने, विद्यार्थ्यांच्या बीईच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशावर गदा आली आहे. या अभ्यासक्रमाच्या इतर विषयांमध्ये भरघोस गुण मिळविणारे बहुसंख्य विद्याथीर् कम्प्युटरच्या या विषयांत चक्क नापास झाले आहेत, तर मोजके विद्याथीर् गुणदान नियमांचा आधार मिळवून काठावर पास झाले आहेत. या विषयाच्या संशयास्पद निकालामुळे जिल्ह्यातील एसएसव्हीपीएस, गंगामाई आणि संजय एज्युकेशन या संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कॅम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळेच राज्याच्या तंत्र शिक्षण मंत्र्यांनी तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाने या विषयांचे पेपर तातडीने पुन्हा तपासाण्याचे आदेश द्यावेत तसेच तोपर्यंत बीईच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करू नये, अशी मागणी अन्यायग्रस्त विद्याथीर् कृती समितीने केली आहे.
 

आगामी हंगामात उसाचा सुकाळ!

यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या उत्पादनाचा अंदाज साफ चुकल्यामुळे ‘सावध’ झालेल्या साखर आयुक्तालयाने उसाच्या लागवडीखालील क्षेत्राची उपग्रह पाहणी करून आगामी हंगामात सुमारे ७२५ लाख मेट्रिक टन उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. चांगला दर आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने आगामी वर्ष हे ऊस उपलब्धतेच्या दृष्टीने ‘सुकाळ’ ठरणार आहे. मात्र उत्पादन वाढीमुळे ऊस दर घटण्याची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे.
उसाच्या उत्पादनात चढ-उतार होण्याचे चक्र गेली अनेक वर्षे सुरू आहे. साधारणत: दर तीन वर्षांनी अशा पद्धतीच्या चक्राला शेतकरी व सहकारी साखर कारखानदारीला सामोरे जावे लागते. मात्र हा अंदाज फोल ठरवित हंगामात तब्बल ६२५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला. हा ऊस गाळप करताना सहकारी साखर कारखानदारीची दमछाक झाली आहे. आर्थिक दुष्टचक्रात सापडल्याने बंद पडलेले राज्यातील बावीस सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. हे कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत देण्याची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. याशिवाय तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळही पुरविण्याची तयारी करण्यात येत आहे. साखर कारखानदारीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिसमितीची बैठक पुढील महिन्यात होत आहे. या बैठकीत हे कारखाने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न कसे करता येतील याबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्यातील १४४ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम घेतला. मात्र यातील काही कारखाने पूर्ण गाळप क्षमतेने चालले नाहीत. हे कारखाने पुढील वर्षी पूर्ण क्षमतेने सुरू राहतील याचीही दक्षता घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. उसाचा दर अपेक्षेपेक्षा जादा मिळाल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे धाव घेतली. त्यामुळे आगामी वर्षांत उसाचे बंपर पीक असणार आहे. मात्र जादा उपलब्धतेमुळे उसाचे दर कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेचे खुल्या बाजारातील दर या काळात कसे राहतील यावर उसाचा दर अवलंबून राहणार आहे.
 

सातपुडा हिरवागार होणार

आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पाल येथे 'हिरवा सातपुडा अभियानांतर्गत' वृक्षलागवडीसाठी पाच हजार खड्डे खणण्यात आले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सातपुड्याच्या सुमारे १०० ते १५० एकर क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.

एकेकाळी हिरवागार असलेला सातपुडा पर्वत आता उजाड आणि बोडका झाला आहे. आसपासच्या परिसराला याचे फटके बसत आहेत. गेल्या काही वर्षांत आजूबाजूच्या परिसरातील तापमानही प्रचंड वाढले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सातपुडा पुन्हा हिरवागार करण्यासाठी हिरवा सातपुडा अभियान राबवण्यात आले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अडीच हजार खड्डे खणण्यात आले आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या १६ जूनला असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

यावेळी चौधरी यांची बियाणेतुला करण्यात आली. साग, वड, निंब, करंज, अंजन, पिंपळ, सीताफळ, अशा विविध वृक्षांची लागवड येथे करण्यात येणार आहे. सातपुड्यात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे येथील पशुपक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. या कार्यक्रमात स्थानिक आदिवासीही सहभागी झाले.
 

BSNL ग्राहकांना सीडीआर बिले !

बीएसएनएलच्या नाशिकमधील लँड लाईन ग्राहकांना यापुढे कॉल डिटेल रेकॉर्ड अर्थात सीडीआर सिस्टिमद्वारे बिले देण्यात येणार आहेत. राज्यात नागपूरनंतर नाशिक येथे ही प्रणाली सर्वप्रथम कार्यान्वित होणार आहे. सीडीआर प्रणालीद्वारे ग्राहकांना महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगड या पश्चिम झोनमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. पेमेंट सिस्टिममध्येही अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दूरसंचार सेवांचा सर्वाधिक वापर करणाऱ्या, तसेच अंतिम मुदतीपूवीर् बिल भरणाऱ्या ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट्स देण्यात येतील. ग्राहकांना एसएमएस, आयव्हीआरएस, वेब, कॉल सेंटर या ग्राहकाभिमुख दूरसंचार सुविधा सहजगत्या मिळतील. तसेच बिल जनरेशन, पेमेंट रिमाइंडर, डाटा युसेज, लिमिट एक्सेस इत्यादी माहिती मिळू शकेल. बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरू करणे, कस्टमाईज बिलिंग ग्राहकांच्या मागणीनुसार व सोयीनुसार ब्रॉड बँड प्लॅन बदलणे, आता सहज शक्य होईल.

 

वृक्षतोडीविरोधात जनतेचा आवाज

सातपूरच्या शिवाजीनगर भागात घरकुल योजनेसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमींची मोठी फळी उभी राहिली असून, मंगळवारपर्यंत दीड हजारांवर हरकती सातपूर विभागीय कार्यालयात नोंदविल्या गेल्या. तसेच शहरांतून पाच हजारांवर वृक्षप्रेमी स्वाक्षरी मोहीमेत सहभागी झाले आहेत. गंगापूर रोड-सातपूर लिंकरोडवरील मोतीवाला कॉलेजसमोरील एका भूखंडावर जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत घरकूल योजना राबविण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. विशेष म्हणजे ज्या भूखंडावर ही योजना राबविली जाणार आहे, त्या ठिकाणी पाच वर्षांपूवीर् महापालिकेने स्वत:च विविध प्रकारची ५ हजारांवर झाडे लावली आहेत. योजनेमुळे सुमारे १ हजार ९०० झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. शहरात अनेक भूखंड बेवारस पडले असताना, त्याकडे डोळेझाक करुन अशा वृक्षाच्छादित भूखंडाकडे वक्रदृष्टी टाकणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात वृक्षप्रेमी संघटीत झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून शहरातील विविध वृक्षप्रेमी संघटनांनी हरकतींसाठी नाशिककरांना आवाहन केले होते. तसेच सह्यांची मोहीमही राबवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच सातपूर विभागीय कार्यालयात हरकतींचा ओघ सुरू झाला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत अशा दीड हजारांवर हरकती दाखल झाल्या होत्या.
 
More Articles...

Join Best Friends Network

Nice Social Bookmark
Facebook MySpace Twitter Digg Delicious Stumbleupon Google Bookmarks RSS Feed 
ताज्या बातम्या
Live Money Machine